मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे उपाध्यक्ष संजय उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाने गृहनिर्माण क्षेत्राला अधिक गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प: गृहनिर्माण क्षेत्राला अधिक गती मिळणार - संजय उपाध्याय - संजय उपाध्याय
अर्थसंकल्पावर महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे उपाध्यक्ष संजय उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाने गृहनिर्माण क्षेत्राला अधिक गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय उपाध्याय, उपाध्यक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ
एकीकडे प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत कोट्यावधी घरांची निर्मिती होत असताना, आता मध्यम वर्गीयांसाठी 45 लाखाचे घर घेणाऱ्यांनाही साडे तीन लाख रुपयांची सूट मिळणार आहे. एकंदरीत सर्वांना घर ही संकल्पना राबवण्यात सरकारला यश येणार असल्याचे उपाध्याय यांनी म्हटलं आहे.