महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: खोदकामात सापडलेले गुप्तधन स्वस्तात द्यायचे आमिष, राजस्थानी टोळीतील 2 जणांना अटक

Mumbai Crime: घरात खोदकाम करताना जमिनीतून गुप्तधन भेटल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीतील 2 जणांना क्राईम ब्रँच युनिट 12 ने ताब्यात घेतले आहे. अंधेरीतील एक दुकानदारांना फसवण्याच्या तयारीत असतानाच या दोन्हीही ठगांना अंधेरी येथून अटक केली

Mumbai Crime
Mumbai Crime

By

Published : Nov 25, 2022, 10:10 AM IST

मुंबई:घरात खोदकाम करताना जमिनीतून गुप्तधन भेटल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीतील 2 जणांना क्राईम ब्रँच युनिट 12 ने ताब्यात घेतले आहे. अंधेरीतील एक दुकानदारांना फसवण्याच्या तयारीत असतानाच या दोन्हीही ठगांना अंधेरी येथून अटक केली आहे. मंछाराम नाथुराम परमार (36) जगदिश उर्फ जगाराम दयाराम साखला (32) अशी अटक आरोपींची नावे आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुप्तधन स्वस्तात देण्याचे आमिष

कुरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक स्टेशनरी दुकान चालवणाऱ्या व्यक्ती आहे. या टोळीतील काही व्यक्तींनी खोदकामात सापडलेले गुप्तधन स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून 4 लाख 60 हजार रुपये उकळले होते. मात्र त्या ठगांनी बदल्यात एकही दागिना दिला नाही. फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच, स्टेशनरी व्यावसायिकाने या संदर्भात कुरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे.

सोने स्वस्तात देण्याचे अमिष दाखवत: फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँच युनिट 12 ने तपासासाठी पथके नेमून शोध कार्य सुरू केले. प्राथमिक तपासात हे सर्व आरोपी राजस्थानमध्ये राहणारे असल्याचे समजले. शिवाय हे मुंबईच्या विविध भागात लोकांना खरे सोने दाखवून असेच सोने स्वस्तात देण्याचे अमिष दाखवत असत. यासाठी संबंधितांकडून मोठी रक्कम देखील घेऊन ते फरार झाले आहे.

गुप्तधन मोठ्या प्रमाणावर सापडले:या टोळीतील लोक दुकानदाराला एकटे गाठून आम्ही मजुरीची कामे करत आहोत. बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम करताना गुप्तधन मोठ्या प्रमाणावर सापडले आहे. ते आम्ही स्वस्तात विकत आहोत. मात्र आम्ही हे सोने सोनार आला विकू शकत नाही, तो कुठेही खुलासा करू शकतो. मात्र हे सोने तुम्ही तपासून घेऊ शकता विश्वास संपादन केल्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी येऊन आम्हाला राजस्थानला जात असतं. हे सोने तुम्हाला स्वस्तात देत आहोत, असे सांगून मोठी रक्कम घेऊन ते फरार होत असतं.

पोलीसांचा तपास सुरू: या टोळीतील दोघांना क्राईम ब्रँच युनिट 12 ने अंधेरी परिसरातून अटक केली आहे. या दोघांकडून नकली सोने आणि गुन्ह्यासाठी वापरलेले 2 मोबाईल देखील जप्त केले आहेत. सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून यांनी अजून कुणाकुणाला फसवले आहे. याविषयीचा तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details