महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१ कोटीहून अधिक लोकांना 'शिवभोजन'चा आधार, योजना गरीबांसाठी वरदान - मुख्यमंत्री - cm uddhav thackeray news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे शिवभोजन योजनेतून जेवण उपलब्ध करून देण्यात आले. या थाळीने गरजवंताना आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले आहे. या योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

एक कोटीहून अधिक लोकांना शिवभोजन थाळीचा आधार
एक कोटीहून अधिक लोकांना शिवभोजन थाळीचा आधार

By

Published : Jun 30, 2020, 7:31 PM IST

मुंबई : महाविकास आघाडीने येत्या प्रजासत्ताक दिनी गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी सुरू केलेली “शिवभोजन” योजना कोरोना आणि लॉकडाऊन काळात कोट्यवधी नागरिकांना फलदायी ठरली आहे. तर, २६ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण झाले आहे. या योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.

महिनानिहाय थाळ्यांचे वितरण

जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ४० आणि जून महिन्यात २९ जूनपर्यंत २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण राज्यात झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरित लोक, बेघर लोक तसेच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले.

यंत्रणेचे कौतुक

या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतुक केले आहे.

केंद्राची स्वछता

शिवभोजन केंद्र चालकांनादेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details