मुंबई- शहरात एकीकडे लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्या तरी अफवांचा बाजार मात्र तेजीत आहे. असेच काहीसे चित्र मुंबईतील नागपाडा भागात पाहायला मिळाले. ट्रेनसाठीच्या अफवेमुळे स्थलांतरित कामगरांनी बुधवारी मुंबईतील नागपाडा भागात दुपारी 4 च्या सुमारास गर्दी करायला सुरुवात केली. बघता बघता शेकडोंमध्ये लोक जमा झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हलक्या बळाचा वापर करावा लागला.
मुंबईत अफवांचा बाजार तेजीत, नागपाडा भागात जमले शेकडो कामगार - special train for labourers from mumbai
मुंबई - शहरात एकीकडे लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्या तरी अफवांचा बाजार मात्र तेजीत आहे. असेच काहीसे चित्र मुंबईतील नागपाडा भागात पाहायला मिळाले. ट्रेनसाठीच्या अफवेमुळे स्थलांतरित कामगारांनी बुधवारी मुंबईतील नागपाडा भागात दुपारी 4 च्या सुमारास गर्दी करायला सुरुवात केली.
बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनसमधून मुंबईहून लखनौला स्थलांतरितांसाठी विशेष गाडी सोडली गेली. त्या गाडीतून नागपाडा भागातील लोक जाणार होते. याच पार्श्वभूमीवर अफवेमुळे परिस्थिती बिघडली. या घटना मुंबईत लॉकडाऊन सुरु झाल्यापासून घडत आहेत. आधी वांद्रे परिसरात मजूर जमल्याने परिस्थिती बिकट झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी परेलच्या एसटी डेपोमध्येसुद्धा अशा अफवेमुळे कामगारांनी गर्दी करून लॉकडाऊनचे उल्लंघन केले होते.
आता आपण लॉकडाऊनच्या 3च्या पर्वात आहोत. अशात अफवांच्या बाजारामुळे कामगार हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने यात स्वतः लक्ष घालून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.