मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. आता या नोटीस संदर्भात अर्णब गोस्वामी यांना उद्या सायंकाळी पाच वाजता विधान भवनात हजर राहून साक्ष नोंदवावी लागणार आहे. तर, आमदार प्रताप सरनाईक यांची देखील साक्ष या प्रकरणात नोंदवली जाईल.
हेही वाचा -बाळासाहेब ठाकरे योजनाही सरकारला राबवता आली नाही; दरेकरांची सरकारवर टीका
उद्या अर्णब गोस्वामी हक्कभंगाच्या कारवाईसाठी उपस्थित राहणार का, याकडे देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आपले काम व्यवस्थित करता यावे म्हणून काही विशेष अधिकार दिले जातात. काम करताना आमदार किंवा खासदार यांचा कोणी अपमान केला, तर त्याच्या विरोधात हक्कभंग केला जाऊ शकतो.