मुंबई : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा आणि पुरवण्या मागण्यांवरील चर्चा झाली. राज्याच्या हिताच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली आणि काही मुद्दे मांडले गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अभिभाषणाच्या चर्चेत अनेक आमदारांनी प्रश्न मांडले आणि सत्ताधाऱ्यांनीही काही बाबतीत जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर मुद्दे मांडले मात्र मुख्यत्वे चर्चा झाली ती ती राजकीय मुद्द्यांवरूनच.
जितेंद्र आव्हाड, राम सातपुते आमने सामने :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात चर्चा करताना भारतीय जनता पार्टी ही एका विशिष्ट धर्माच्या प्रचार करीत आहे. विशेषतः हिंदू धर्माच्या आणि सनातनी धर्माच्या प्रचारासाठी काम करीत आहे की काय. असा संशय निर्माण होत असल्याबाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात भाजपचे आमदार राम सातपुते यांनी काही प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते तुम्हाला मिळालेली आमदारकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाली आहे. अन्यथा तुम्ही चाकरी केली असती, असे उद्गार काढल्याने राम सातपुते आक्रमक झाले. ते म्हणाले बाबासाहेबांमुळेच मला आमदारकी मिळाली आहे, तुमच्या शरद पवारांमुळे नाही. सातपुते यांच्या या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी याला जोरदार प्रतिवाद करीत आक्रमकपणे माफी मागण्याची विनंती केली. जर माफी मागितली नाही तर, सभागृह चालू देणार नाही असे म्हटल्याने पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. राम सातपुते यांनी माफी मागितल्यानंतरच सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
मला एक महिन्यात तुरुंगात टाकण्याचा डाव :राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करीत आपल्याला एक महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्यासंदर्भात त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचा दावा केला. तसेच आपल्या कुटुंबालाही त्रास देण्यात येणार असल्याचे समजल्या बाबत नाराजी व्यक्त केली. तुम्ही आमचा पक्ष संपवला आमचे धनुष्यबाण घेतले. मात्र, आम्ही तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यामुळे पुन्हा एकदा सभागृहाचे वातावरण तापले.
शेतकऱ्यांना न्याय द्यावा :तत्पूर्वी विरोधकांच्या वतीने सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित करण्यात आले. कांद्याचे दर पसरल्या संदर्भामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात औचित्य मुद्द्याद्वरे प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शेतकरी हवालदार असुन नाफेड ने कांदा खरेदी अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ताबडतोब खुल्या बाजारात बोली लावून ना फेडणे खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भुजबळ यांनी सभागृहात केली.