महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Central Agencies Misuse : केंद्रीय एजन्सींचा गैरवापर होतोय का? वाचा सविस्तर - Are central agencies being misused

देशात सत्तेसाठी भाजपा काहीही करू शकते. महाराष्ट्रात देखील केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करूनच सत्ता मिळवल्याचे वारंवार विरोधकांकडून बोलले जात आहे. खरंच भाजपा केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतोय का पाहूया.

Central Agencies Misuse
केंद्रीय एजन्सींचा गैरवापर होतोय का?

By

Published : May 15, 2023, 3:02 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आणि काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी माध्यमांशी बोलताना

मुंबई : तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा बोगसपणा नवाब मलिक यांनी बाहेर काढला होता. नार्कोटिक्स ब्युरोच्या माध्यमातून फर्जीवाडा करून धाडी टाकल्या जात आहे. त्या माध्यमातून लाखो करोडो रुपयांची उकळणी केली जात आहे. तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्यानंतर वानखेडे यांची चौकशी झाली आणि त्यांची बदली करण्यात आली. चौकशी दरम्यान सीबीआयने वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याचाच अर्थ नवाब मलिकांनी केलेले आरोप सत्य होते, त्यात तथ्य होते. एका चांगल्या नार्कोटिक कंट्रोल सारख्या संस्थेचा दुरूपयोग समीर वानखेडे करत असल्याचे स्पष्ट झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.


धाक केंद्रीय एजन्सींचा : अमोल मातेले म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा मागील गेल्या 2014 पासून कसा गैरवापर होत आहे, हे आपण पाहिले आहे. केंद्रीय एजन्सीचे जास्त प्रेम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीतील नेत्यांवर असल्याचे दिसते. यापूर्वी देखील तात्कालीन मंत्री आमदार मोठे नेते यांना देखील केंद्रीय एजन्सीचा धाक दाखवून भाजपणे वॉशिंग मशीन मध्ये टाकून आपल्या पक्षात सामील केले. भाजपात सामील झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही. कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही. दबाव गट निर्माण करून एखाद्या राज्यातील विरोधी पक्ष कसा ढेपाळायचा, आपल्या विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे, असे धाक निर्माण करायचा. माझी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पोलीस दलात सामाविष्ट करून घेण्यात आले आहे. तत्कालीन गृहमंत्र्यावरती रणवीर सिंग यांनी अनेक आरोप केले असताना देखील पुन्हा पोलीस दलात घेतले जाते. ही महाराष्ट्रासाठी निंदनीय बाब आहे. केंद्रातील असो व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलला तर केंद्रीय एजन्सींचा धाक दाखवला जातो. नेत्यांची चौकशी, त्यांच्या मुलांची चौकशी, खोटे नाटे आरोप करून गुन्हे दाखल केले जातात. अशा प्रकारच्या दबावावर तंत्राला महाराष्ट्र कधी माफ करणार अशा प्रकारचे प्रतिक्रिया अमोल मातेले यांनी दिली आहे.


लोकशाही संपवण्याचे काम भाजपा करत आहे :भारतीय जनता पार्टी केंद्रीय एजन्सीचा वापर करून पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांवर चौकशीचा ससेमीरा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस पाठवली आहे. जेव्हा भाजप बॅक फुटवर जाते, त्यावेळेस केंद्रीय एजन्सी भुंगे मागे लावण्याची काम सरकार करते. काही करून भाजपची सत्ता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून कोणालाही ईडीची नोटीस पाठवण्याचे काम ते करत आहे. लोकशाही संपवण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे. सत्तेतील गणितांची जुळवाजुळ करण्यासाठी प्रत्येक वेळी केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केंद्रीय एजन्सीचा वापर केला असल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र त्यावेळेस सत्ताधारी पक्ष आता विरोधात बसलेले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फायरी हे दोघांकडून होणार हे निश्चित.

ABOUT THE AUTHOR

...view details