महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई शहर जिल्ह्यात अंदाजे 50 टक्के मतदान

मुंबई शहर जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदारांनी मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मतदारांचे आभार मानले.

By

Published : Oct 22, 2019, 9:41 AM IST

मुंबई शहर जिल्ह्यात अंदाजे 50 टक्के मतदान

मुंबई- शहर-जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. या ठिकाणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई शहर जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदारांनी मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मतदारांचे आभार मानले.

हेही वाचा - मालवणीत तृतीयपंथी बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया अत्यंत शांतते पार पडली. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मतदाराच्या मतदान यादीबाबत तक्रारी आल्या नाहीत. मतदारांना मतदान चिठ्ठी घरपोच देण्यात आल्या. तसेच मतदान केंद्रावर मदतकक्ष स्थापन करण्यात आले होते. मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ मतदारांनी घेतला.

हेही वाचा -एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?

मतदारांना विविध सुविधा -

मतदारांना मतदान केंद्रात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांगासाठी प्रशासनातर्फे व्हील चेअर देण्यात आल्या होत्या. याचा 200 पेक्षा अधिक गरजू मतदारांनी लाभ घेतला.

तळमजल्यावर मतदान केंद्र -

मतदानासाठी 2 हजार 498 मतदान केंद्र तळमजल्यावर केल्यामुळे ज्येष्ठ नागरीक व इतर मतदारांनी समाधान व्यक्त केले. पावसाचा अंदाज आल्याने तातडीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून पाणी साचलेल्या ठिकाणी फुटपाथ तयार करून मतदानासाठी मतदारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बंद पडण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. मतदानाच्या दरम्यान वरळीसह सर्व मतदारसंघात 18 बॅलेट युनिट, 18 कंट्रोल युनिट, 100 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. यावेळी मतदानामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योजक, प्रसिध्द व्यक्ती, राजकीय व्यक्ती, सिने कलाकार, खेळाडू यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरूवारी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details