मुंबई - मोदी 2 सरकारचा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निराशा पाडणारा अर्थसंकल्प आहे. कर वाढवून सामन्यांची लूट, महागाईने गरिबांचे कंबरडे मोडले आहे तसेच शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम सरकार करित आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत नेणारा अर्थसंकल्प - विजय वडेट्टीवार - गरिबांचे कंबरडे
शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. गेल्या 5 वर्षात बेरोजगारांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. 45 वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी मोदी सरकारच्या काळामध्ये आहे. गेल्या 5 वर्षात बेरोजगारांच्या पदरी निराशा पडली आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात काहीही ठोस तरतूद नाही. तसेच महागाई आणि टॅक्सच्या नावाने गरिबांची लूट सुरु आहे. पैसा जमवून उद्योगपतींसाठी लाल कार्पेट टाकण्याचे काम सरकार करित असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारने गरिब जनता, बेरोजगार आणि शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.