मुंबई -महाराष्ट्र शासनाने काल उशिरा राज्यातील समस्त माध्यमिक शाळांसाठी ( Recognized Secondary School in the State ) उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी तासिका तत्वावर शिक्षक ( Teacher on hourly basis ) नेमण्याचे ठरवलेले आहे या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात दूरगामी परिणाम ( Impact on education sector ) होण्याचा संभव आहे. याची संभावना ईटीव्हीने नुकतीच व्यक्त केली. तसेच झाले शिक्षण क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक -राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा अर्थात इयत्ता नववी, दहावी आणि उच्च माध्यमिक शाळा इयत्ता अकरावी, बारावी तसेच कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी तासिका तत्त्वावर अर्थात क्लॉक अवर बेसिस या तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक होणार ( Appointment of teachers on hourly basis ) आहे. ज्या ठिकाणी अर्धवेळ शिक्षक नसेल तर घड्याळी तासिकेनुसार शिक्षकांना मानधन देण्यात येईल.
मानधनावर भावी शिक्षकांचे भवितव्य - या तासिका तत्त्वावर ज्या शिक्षकांची नियुक्ती होईल. त्यामध्ये माध्यमिक स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रतितास 120 रुपये असे मानधन दिले जाईल. तर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या या शिक्षकांना रुपये 150 प्रती तास असे मानधन देण्यात येणार आहे. हा शासन निर्णय राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लागू असणार आहे. राज्यामध्ये मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या ही तीन लाखाच्या पेक्षा अधिक आहे .या क्षेत्रावर याचे दूरगामी परिणाम ( Impact on education sector ) होणार आहे.