महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Old Pension: केंद्रातील महाशक्ती पाठीशी आहे तर जुनी पेन्शन लागू करा -उद्धव ठाकरे - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे. पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनात या अर्थसंकल्प अधिवेशनात तिसऱ्यांदा हजेरी लावली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Old Pension
Uddhav Thackeray

By

Published : Mar 15, 2023, 8:23 PM IST

मुंबई :याप्रसंगी बोलताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांचा लाल बावटा मोर्चा हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने येत आहे. आमच्या सरकारच्या काळात सुद्धा अशा पद्धतीचा मोर्चा निघाला होता, तेव्हा आदित्य ठाकरे जाऊन त्यांना भेटले होते. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर सरकारने विचार करायला हवा. त्यांना भेटायला हवे. सरकार आज उद्या, आज उद्या करत आहे. हे बरोबर नाही आहे.शेवटी ते आपले अन्नदाते आहेत. त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार व्हायला हवा, असेही ठाकरे म्हणाले.

जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी संपावर आहेत. शिवसेनेचा या कर्मचाऱ्यांना पाठिंबा आहे. सरकार म्हणते की त्यांच्या मागे केंद्रातली महाशक्ती आहे, मग त्यांना हा बोजा सहन करायला काय हरकत आहे. ते महाशक्तिशाली, ताकतवर आहेत, मग त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी. असे सांगत २००५ साला पर्यंत ही योजना सुरू होती. नंतर अटलजी यांच्या काळात ती बंद करण्यात आली. या योजने मध्ये कर्मचाऱ्याला त्याच्या भविष्याच्या दृष्टीने आधार वाटत असेल तर त्यात गैर काय आहे. मग सरकार नेमके करते काय आहे? असा प्रश्न उपस्थित करत या संदर्भातही काही लोक आज मला भेटले उद्याही भेटणार आहेत.

टेक्सटाइल कमिशन ऑफिस सुद्धा दिल्लीला : सरकारने अर्थसंकल्प घोषित केला त्याला नाव दिले आहे पंचामृत. म्हणजे सरकार आता पळी पळीने अमृत देणार आहे.म्हणजे पोटभर कोणालाही भेटणार नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारे येत असतात व जातात. पण हे जे कर्मचारी, यंत्रणा आहेत त्या कायम असतात. म्हणून त्यांना त्यांच्या हक्काचे मिळालेच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, आता सरकारी नोकरी भरतीच्या नावावर सरकारने आऊट सोर्सिंग सुरू केले आहे. म्हणजे स्वतःची खुर्ची फक्त स्थिर ठेवायची व इतरांना ढकलून द्यायचे असही ते म्हणाले.

सर्वकाही दिल्लीश्र्वराच्या चरणी अर्पण करायचे : राज्यात,देशात अस्थिरता निर्माण करायची हे बरोबर नाही आहे. हा त्यांचा कुटील डाव आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेल्यानंतर आता टेक्सटाइल कमिशन ऑफिस सुद्धा दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगत एसीसी च ऑफिस ते मालक बदल्यावर गुजरातला घेऊन गेले. थोडक्यात काय तर सर्वकाही दिल्लीश्र्वराच्या चरणी अर्पण करायचे व त्यांचे गुलाम म्हणून वागायचे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे -फडणवीस सरकारला लगावला आहे.

हेही वाचा :Deepak Sawant Joins Shiv Sena : शिंदे सेना जोमात, उद्धव सेना कोमात; दीपक सावंतांनी घेतले धणुष्यबाण हाती

ABOUT THE AUTHOR

...view details