मुंबई :वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Senior IPS officer Rashmi Shukla) यांच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या फोन टॅपिंग केल्या प्रकरणात मागील वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात रश्मी शुक्ला यांनी दोषमुक्ती करिता मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात (Application in Metropolitan Magistrate Court) अर्ज केला (acquittal of Rashmi Shukla) आहे.
गुन्हा दाखल :रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कुलाबा पोलीस स्टेशनच्या वतीने रश्मी शुक्ला यांचा दोनवेळा जबाब देखील नोंदवला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचा फोन टॅपिंग केल्याचा आरोप (acquittal of Rashmi Shukla in phone tapping case) आहे.
टॅपिंग प्रकरणाचा खटला : रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणाचा खटला चालवण्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकारने नकार दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहे. कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाला खटला चालवण्याकरिता परवानगी मागण्यात आली होती. केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. रश्मी शुक्लाविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारनेही नकार दिला (Rashmi Shukla in phone tapping case) आहे.