नवी मुंबईAPMC Public Toilet Scam:माजीआमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सात आजी माजी 'एपीएमसी' अधिकाऱ्यांवर शौचालय घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालायं. यामध्ये रवींद्र आनंदराव पाटील (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), सिताराम कावरखे (सेवानिवृत तत्कालीन उपसचिव), जी. एम. वाकडे (सेवानिवृत्त तत्कालीन उपसचिव), विजय पद्माकर शिंगाडे (उपसचिव एपीएमसी), सुदर्शन पांडुरंग भोजनकर (उपअभियंता, एपीएमसी), राजेंद्र झुंजारराव (कनिष्ठ अभियंता, एपीएमसी), विलास पांडुरंग पवार (कार्यालयीन अधीक्षक, बाजार समिती) यांचा समावेश आहे. या आठ जणांनी मिळून वेळोवेळी कायद्यानं ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून 'एपीएमसी'साठी नुकसानदायक निर्णय घेतले.
स्वच्छतागृहाच्या व्यवहारात लबाडी:या आठ जणांनी कायदेशीर कर्तव्ये पार न पाडता समितीच्या गरजेचे आणि हिताचे कायदेशीर करार केले नाहीत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार येथील स्वच्छतागृहाच्या व्यवहारात लबाडी केली. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून २०१७ पूर्वी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबविली नाही. सन २०१७ ते २०१८ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार सुरेश मारु यांच्या सोबत असणाऱ्या हितसंबंधामुळे त्यांच्याशी संबधित संस्थांना फायदा होण्याकरिता नियमबाह्य पध्दतीनं ही स्वच्छतागृहं भाडेतत्त्वावर दिली.