महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एपीएमसीमध्ये कांद्याला नाही भाव; परतीच्या पावसाचा कांदा व्यापाऱ्यांना बसला फटका - APMC no onion or price

राज्यभरात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या परतीच्या ( Loss of farmers due to return rains ) पावसाचा कांद्यालाही चांगलाच फटका ( Onions are also hit by the return rains Onions are also hit by the return rains ) बसला आहे. APMC मध्ये येणाऱ्या कांद्यापैकी 70 टक्के कांदा खराब असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं ( Agricultural Produce Market Committee ) आहे. शेतकऱ्यांनी पावसामुळे चाळीत साठवलेला जवळपास 30 ते 40 टक्के कांदा सडला आहे. पाऊस सुरुच असल्याने नवीन कांदा यायला वर्ष अखेर किंवा नवीन वर्ष उजाडणार आहे.

APMC no onion
APMC no onion

By

Published : Oct 24, 2022, 5:32 PM IST

नवी मुंबई - राज्यभरात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या परतीच्या ( Loss of farmers due to return rains ) पावसाचा कांद्यालाही चांगलाच फटका ( Onions are also hit by the return rainsOnions are also hit by the return rains ) बसला आहे. APMC मध्ये येणाऱ्या कांद्यापैकी 70 टक्के कांदा खराब असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं ( Agricultural Produce Market Committee ) आहे. शेतकऱ्यांनी पावसामुळे चाळीत साठवलेला जवळपास 30 ते 40 टक्के कांदा सडला आहे. पाऊस सुरुच असल्याने नवीन कांदा यायला वर्ष अखेर किंवा नवीन वर्ष उजाडणार आहे.

परतीच्या पावसाचा कांदा व्यापाऱ्यांना बसला फटका

त्यातही कांद्याचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. शिवाय कीड, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असताना APMC मधील कांदाव्यापारी देखील हवालदिल झाले आहेत. बाजारात हलका भिजलेला कांदा येत आहे. त्यापैकी खाण्यायोग्य कांदा निवडून वेगळा करावा लागतोय. हलक्या कांद्याला किलोमागे 2 रु., 5 रु., 6रु. असा दर आहे आणि चांगला कांदा 15 ते 16 रु. किलो विकला जात आहे. कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकावा लागला आहे. एकीकडे भाव कमी मिळत आहेत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलपासून भाव वाढण्याच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला होता, त्यांचा आता 30 ते 40 टक्के कांदा सडला असताना परतीच्या पावसाची यात भर पडली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहेत. शिंदे सरकार आमच्याकडे लक्ष देणार का आमच्या समस्येवर तोडगा कधी काढणार असा प्रश्न आता APMC मधील व्यापारी विचारताना दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details