मुंबई:महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे भाग चांगलेच गाजले एकनाथ शिंदेनी बंड (Eknath Shindeni Rebellion) करत शिवसेना पक्षल प्रमुख उध्दव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला नंतर न्यायालय, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षपदाची निवड सगळ्या प्रक्रियेत अनेक वाद विवाद समोर आले आणि अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शपथविधी करत सरकार स्थापन केले. शिंदे फडणवीस सरकार स्थापनेतील आक्षेपावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर इकडे सरकार स्थापने नंतर एक महिना लोटला आहे, यात अजुनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. केवळ दोनच लोकांवर राज्याचा कारभार सुरु आहे.असे बिना मंत्रीमंडळाचा कारभार चालवणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे.
सरकारच बेकायदेशीर : सत्तेला एक महिना पूर्ण होऊनही मंत्रिमंडळ विस्ताराची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. शिंदे कडुन लवकरच विस्तार केला जाईल असे सांगण्यात येत आहे. मंत्रीमंडळ नसले तरी जनतेची कामे अडकलेली नाहीत हे पण वारंवार सांगण्यात येत आहे शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सदस्यीय मंत्रिमंडळाने आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला दिलेली स्थगिती मागे घेण्यासह काही विरोधाभासी निर्णय घेतले जात आहेत, तर विरोधी पक्षांनी या दोघांच्या कारभारावर जोरदार आक्षेप नोंदवत हे सरकारच बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांचे निर्णयही बेकायदेशीर असल्याचे आरोप केले आहेत.
तेलंगणात 66 दिवसानंतर मंत्रीमंडळ: केसीआर यांनी 13 डिसेंबर 2018 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यांनी जबरदस्त विजय मिळवून सत्ता मिळवली पण ते सत्तेत आल्यानंतर त्यांनी 19 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. के चंद्रशेखर राव यांनी सुमारे 66 दिवसांच्या अंतरानंतर मंत्रीमंडळ स्थापन केले होते दोन महिण्यापेक्षा जास्त काळ बिना मंत्रीमंडळाचे सरकार चालवण्याचा पहिला विक्रम त्यांच्या नावावर आहे अशी त्यांच्यावर टीका होत होती.