मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तपास केला जात असताना अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानीला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
एनसीबीची ड्रॅगसच्या विरोधात कारवाई सुरूच आहे. या कारवाईत एनसीबीने अनुज केशवानी नावाच्या अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. रिया चक्रवर्तीशी संबंधित ड्रग्स टोळीतील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा संबंध हा थेट कैझेन इब्राहीमसोबत असून त्याने केशवानीचे नाव घेतले. कैझेनने त्याचा पुरवठादार म्हणून केशवानीचे वर्णन केले होते.