मुंबई :सर्वाच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मंजूर केलाय. शर्मा यांनी पत्नीचा आजारपणाचे कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता, तो सर्वोच्च न्यायालयान मंजूर केलाय. दरम्यान जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. परिणामी शर्मा यांना सर्वोच न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर करत प्रदीप शर्मा यांना दिलासा दिला आहे.
तुरुंगात का :प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये मुंबई पोलिसात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. शर्मा यांचा 300 हून अधिक एन्काऊंटरमध्ये सहभाग आहे. त्यापैकी 113 एन्काऊंटर त्यांच्या नावावर आहेत. आता ते अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणात तुरुंगात आहेत. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ जिलेटिनने भरलेली एसयूव्ही कार सापडली होती. ही एसयूव्ही कार व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. परंतु मनसुख हिरेन हे 5 मार्च 2021 रोजी ठाण्यातील एका खाडीत मृतावस्थेत आढळले होते.
जामीन अर्ज : प्रदीप शर्मा यांनी अनेकवेळा जामीन अर्ज केला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळली होती. न्यायालयात स्वत: ला निर्दोष सांगतना प्रदीप शर्मा म्हणाले होते की, ते अनेकवेळा पोलिसांच्या शत्रूत्वाचे बळी ठरलेत. सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज करताना त्यांनी त्यांच्या पत्नीचा आजारपणाचे कारण सांगितलंय. शर्मा यांनी पत्नीची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात केला होता. मागे एकदा सर्वोच्च न्यायालयाने 5 जून 2023 रोजी 4 आठवड्याचा अंतरिम जामीन दिला होता. मात्र आज प्रदीप शर्मा यांनी वैद्यकीय अहवाल कागदपत्रे न्यायालयात सादर केले. त्यांचे वाकिल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला विनंती केली. पत्नीच्या गंभीर आजारावर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यासाठी नियमित जामीन मिळाल्याशिवाय वैद्यकीय उपचार कसे होणार ?असे त्यांनी याचिकेत म्हटले.