मुंबई - Look Back 2022 : पश्चिम बंगालच्या नक्षलबारी येथे चारू मुजुमदार यांनी जमीनदारांच्या विरोधात संघर्ष उभा करून मोठे आंदोलन उदयास आणले. या आंदोलनात नक्षलबारीचे पीडित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. तिथूनच नक्षलवादी हा शब्द रूढ झाला. प्रारंभी साम्यवादाचा विचार मांडत जमीनदारांच्या विरोधात उभी ठाकलेली ही संघटना वेगळ्या मार्गावर जात राहिली आणि पुढे जाऊन तिचे स्वरूप बदलत गेले. पुढे या चळवळीने महाराष्ट्रात काही स्थानिक प्रश्न घेऊन प्रवेश केला. 80 च्या दशकात ही चळवळ गडचिरोली, गोंदिया आणि राज्याला लागलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पाय पसरायला लागली. त्याची सुरुवात शंकर अण्णा नावाच्या नक्षल्याने केली. (2022 Year Ender) गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात म्हणजे सिरोंचा आणि अहेरी भागात त्याने सुरुवातीला पाय ठेवला. त्याला सक्रिय मदत करणारे मोठे नेते आंध्रप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर कार्यरत होते. (Anti-Naxalite operations 2022 ) यात किशन जी, गणपती, तिरुपती यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. शंकर अण्णा चकमकीत ठार झाल्यानंतर सूरन्नाने सूत्रे हाती घेतली. आणि त्याला आणि चळवळीला मोठे करण्यासाठी किशन जीसह इतरही मोठे नेते आंध्रप्रदेशची सीमा ओलांडून महाराष्ट्रात आले. चळवळ पाय पसरत असतानाच (1990)च्या सुमारास नर्मदाक्का नावाच्या एका तरुण महिला नक्षलीने येथे प्रवेश केला. त्यानंतर सुरन्ना आणि नर्मदाक्काने झपाटल्यागत कामाला सुरुवात केली. त्यावेळी तेंदूपत्ता (ज्याला विडीपत्ता असेही म्हणतात) ठेकदारांकडून स्थानिक मजुरांना दिली जाणारी मजुरी अत्यल्प होती. सोबतच निरक्षर-निर्धन आदिवासींवर होणारे अत्याचार, हे दोन मुद्दे घेऊन ही चळवळ येथे सक्रिय झाली आहे.
महाराष्ट्रात (2022)मध्ये नक्षलविरोधी झालेल्या कारवाया खालीलप्रमाणे -1)8 ऑक्टोबर 2022 रोजी: गडचिरोली येथे नक्षलविरोधी अभियानात दोन कथित नक्षलवादी पकडले गेले, त्यांना पकडण्यासाठी नक्षलवादी जोडीवर 10 लाखांचे बक्षीस होते. जिल्ह्याच्या उत्तर भागात मोडीत काढलेल्या नक्षल चळवळीला पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नक्षल्यांच्या कंपनी १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर (पीपीसीएम) सनीराम याच्यासह आणखी एका नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. यामुळे उत्तर भागात नक्षल्यांना पुन्हा एक हादरा बसला. सनीराम याच्यावर ८ लाखांचे, तर सहकारी समुराम याच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात २ संशयित व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
2) 20 फेब्रुवारी 2022: गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात चार नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील दामरेचा जंगलात स्फोटक पुरवणाऱ्या चार आरोपींना अटक (Four accused arrested,) करण्यात आली. जंगलात छत्तीसगड राज्यात वायर बंडल स्फोटक पदार्थ व काही नक्षलवाद्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा हे समर्थक करत होते. सदर कारवाई अहेरी तालुक्यातील दामरेचा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली. चार नक्षलसमर्थकांकडून दहा नग कार्डेक्स वायरचे बंडल नेले जात होते. हे बंडल साडेतीन हजार मीटर लांबीचे आहे. हे साहित्य जप्त करण्यात आले. करीमनगर जिल्ह्यातील आसिफनगरचे राजू सल्ला, अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा येथील काशिनाथ गावंडे, साधू तलांडी, करीमनगर जिल्ह्यातील आसिफनगरचा मोहम्मद शादुल्ला व अहेरी येथील सिनू मुल्ला गावडे या आरोपींना अटक करण्यात आली.
3) 21 एप्रिल 2022 : रोजी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 18 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या चार नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली. याचवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना अटक केली होती. यात एक महिला नक्षलीचाही समावेश होता. यातील दोन जहाल नक्षलवाद्यांवर 14 लाखांचे तर उर्वरित दोघांवर 4 लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत 15 लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याला अटक केली आहे. नालासोपाऱ्यातून त्याला अटक करण्यात आली. हुलाश यादव, असे या 45 वर्षीय अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच माओवादी संघटनेचा सदस्य आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर 15 लाखांचे बक्षीस ठेवले होते.
4) 25 मे 2022 : राज्य सरकारच्या ‘आत्मसमर्पण-सह-पुनर्वसन धोरणा’अंतर्गत दोन कट्टर नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली, ज्यांच्यावर प्रत्येकी 6 लाख रुपयांचे इनाम होते. गडचिरोली जिल्हा पोलीस दलासमोर सहा लाखांचे बक्षीस असलेल्या एरिया अॅक्शन टीमचा सदस्य ऊंगा उर्फ लक्ष्छुराम पांडू वड्डे, बाली उर्फ कविता बुकलू पुंगाटी व कुमली उर्फ शांती शंकर कवडो या तीन नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. कधी काळी वैचारिक चळवळ म्हणून डंका पिटणाऱ्या नक्षली नेत्यांनीच खंडणीखोरी सुरू केल्याने जीवाच्या भीतीने नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलातर्फे नवजीवन योजना राबविण्यात आल्याने नक्षल सदस्यांना आत्मसमर्पणासाठी प्रोत्साहन मिळाले. तसेच, मागील वष्रेभरात झालेल्याआत्मसमर्पणाबरोबरच चालू वर्षीही ओघ सुरू आहे.