महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime धारावीतून २८ लाखांचे मेफेड्रीन ड्रग्ज जप्त, तीन तस्करांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या - कुख्यात तस्करावर अनेक गुन्हे दाखल

धारावी परिसरात ( Dharavi Area At Mumbai ) मेफेड्रीन ड्रग्ज तस्करी करताना अमली पदार्थ विरोधी पथकाने ( Anti Narcotics Sell Action ) तीन तस्करांना अटक केली. ही कारवाई वरळी युनीटसह अमली पदार्थ विरोधी ( Drug Smugglers Arrest ) पथकाने केली. या तस्करांकडून 28 लाखाचे मेफेड्रीन हे ड्रग्ज ( Anti Narcotics Sell Seize 28 Lakh Rupees MD Drug ) पथकाने जप्त केले. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Anti Narcotics Sell Action
अमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केलेले तस्कर

By

Published : Jan 11, 2023, 1:48 PM IST

मुंबई - शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या ( Anti Narcotics Sell Action ) वरळी युनिटने धारावी परिसरातून ( Dharavi Area At Mumbai ) तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. या तीन तस्करांकडून १४० ग्रॅम मेफेड्रीन ( एमडी ) हे अमली पदार्थ ( Drug Smugglers Arrested ) जप्त केले आहे. त्याची किंमत २८ लाख रुपये इतकी आहे. तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केलेले तस्कर

वरळी युनिटने केली कारवाईमुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने केलेल्या या कारवाई प्रकारणी एनडीपीएस कायदा १९८५ कलम- ८ (क) सह २२ (ब), २२ (क), २९ अन्वये गुन्हा ( Anti Narcotics Sell Seize 28 Lakh Rupees MD ) दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी रात्री ९. ४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. तिन्ही आरोपींकडून १४० ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

धारावीतील टी जंक्शन येथून केले अटकअमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट, मुंबईचे पथक हे अमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे तस्कर, पुरवठा, साठा करणाऱ्या तस्करांचा गस्तीदरम्यान शोध घेत होते. यावेळी सोमवारी रात्री धारावीतील ( Anti Narcotics Sell Seize 28 Lakh Rupees MD ) टी जंक्शन या ठिकाणी २० वर्षे आणि २१ वर्षे वयाचे दोन संशयितांच्या संशयास्पद हालचालीवरून त्यांना पथकाने ताब्यात घेतले. नंतर दोन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी हे अमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर एका आरोपीने त्याच्याकडे असलेले अमली पदार्थ त्याने कोणाकडून घेतले, याबाबत चौकशी केली. यावेळी त्याने दुसऱ्या आरोपीकडून अमली पदार्थ घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीकडे आढळून आलेले एमडी हे अमली पदार्थ त्याने कोणाकडून घेतले याबाबत चौकशी केली गेली. त्यावेळी त्याने धारावीतील अजीज कंपाउंड येथील तिसऱ्या आरोपीची माहिती दिली. पोलीस पथकाने त्यालाही ताब्यात घेऊन त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे एमडी हे अमली पदार्थ आढळून आले. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने या आरोपीविरुद्ध कलम ८ (क) सह २२ (ब), २२ (क), २९ एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तिन्ही तस्करांना अटक करण्यात आली.

कुख्यात तस्करावर अनेक गुन्हे दाखलया तस्करीत असलेल्या तिसरा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात धारावी पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये आयपीसी कलम ३२४, ३२३, ५०४, ४२७ ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. धारावी पोलीस ठाण्यात २०२० मध्ये आयपीसी कलम ३२४, ३२३, ५०४, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात २०२० मध्ये आयपीसी कलम ३९९, ४०२ सह ३,४, २५ भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल असून माहिम पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये कलम ८ (क) सह २२ (ब) एनडीपीएस अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल आहे.

या पथकाने केली कारवाईही कामगिरी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, प्रकाश जाधव, सहायक पोलीस आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, सावळाराम आगवणे तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश देसाई, पोलीस शिपाई राठोड, तडवी, दळवी, शेलार, टेकाळे यांनी पार पाडली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details