मुंबई :थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबईच्या रस्त्यावर मुंबई पोलीसांचा फौजफाटा उतरला होता. थर्टी फर्स्टच्या रात्रीला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीसांनी कंबर कसली होती. मुंबई पोलीसांची समाज विघातक घटनांवर आणि व्यक्तींवरती करडी नजर आहे. आफ्रिकन महिलेसह तिघांकडून सव्वा कोटींचे एमडी जप्त करण्यास अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाला यश आले (anti narcotics department seized MD drug) आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाने या आरोपींकडून 610 ग्राम एमडी ड्रग जप्त केले आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री कक्षाकडून गस्त सुरू असताना माहीम सायन लिंक रोड परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले गेले. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली (arrested African woman) आहे.
पोलीस कोठडी :या आरोपींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे त्रिकूट गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज तस्करी करत असल्याचे उघडकीस आले (accused three people including African woman)) आहे. त्यानुसार त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. दरम्यान अमली पदार्थ विरोधी विभागाने याप्रकरणी ठीकठिकाणी जोरदार मोहीम सुरू केली आहे.
यापूर्वीची घटना :29 मार्चला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेंतर्गत गोवंडी परिसरातून एका आरोपीस 250 ग्राम एमडी ड्रगसह अटक (arrest with MD drug) केली होती. त्यानंतर त्याला ड्रग्स पुरवणाऱ्या आरोपीला राहत्या घरातून २ किलो ७६० ग्राम वजनाच्या एमडी ड्रगसह अटक करण्यात आली होती. याप्रकरणी या दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रेमप्रकाशची 19 कोटी 58 लाख 44 हजार 550 रुपये किमतीची मालमत्ता अंमली पदार्थ विरोधी कक्षाने जप्त केली (Mumbai Crime) होती.
ड्रग तस्कराची अगडबंब मालमत्ता जप्त : त्यानंतर गुन्हाच्या पुढील तपासात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली (seized MD drug arrested accused) होती. त्यांच्याकडून नालासोपारा येथील गोडाऊन, अंबरनाथ आणि अमलेश्वर गुजरात येथील फॅक्टरीतून 2400 किलोपेक्षा जास्त वजनाचे एमडी ड्रग त्याची किंमत 4856 कोटी इतकी असून तो जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेमप्रकाश पारसनाथ सिंग यांच्या मालमत्तेची आणि बँक खात्याची माहिती घेतली असता त्याने ड्रगच्या व्यापारातून बेकायदेशीररित्या 18 कोटी 43 लाख 56 हजार 334 मूल्याचे २ फ्लॅट, ९ गाळे, १ मोटरकार आणि आरोपीसह त्याच्या कुटुंबातील सदस्या यांच्या नावे असलेली सहा बँक खात्यातील शिल्लक रक्कम १ कोटी १४ लाख ८८ हजार २१६ रुपये संपादित केल्याचे निष्पन्न झालेले आहे. आरोपी नामे प्रेम प्रकाश सिंग याचे २ फ्लॅट, ९ गाळे, १ कार आणि ६ बँक खात्यातील गोठवलेली रक्कम असे एकूण 19 कोटी 58 लाख 44 हजार 550 रुपये किमतीची मालमत्ता अंमली पदार्थ विरोधी कक्षाने जप्त केली (anti narcotics department) होती.