महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ANC Arrested Drug Peddlers Mumbai : माहीम येथून ४० लाखांचे अंमली पदार्थ जप्त; तिघांना अटक - Latest news from Mumbai

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने माहीम येथून तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून 200 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जही जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत 40 लाख रुपये आहे. अटक आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे युनिटला माहिती मिळाली की, दोन लोक एमडी विकण्यासाठी माहीमला येणार आहेत. माहितीच्या आधारे एएनसीने माहीममध्ये सापळा रचला होता. अखेर एएनसीने दोघांनी रंगेहात पकडले.

ANC Arrested Drug Peddlers Mumbai
अंमली पदार्थांसह तिघांना अटक

By

Published : Jan 13, 2023, 8:20 PM IST

मुंबई :दोन संशयित व्यक्ती माहीममध्ये आले. एएनसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्याकडून 120 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. या दोघांची चौकशी केल्यावर एएनसीने त्या दोघांना ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीचे नाव समजले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तिसऱ्या व्यक्तीलाही अटक केली आणि त्याच्याकडून 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत एएनसीने अतिक हमीद शेख, शाहिद आदम शेख आणि अल्तमश शेख यांना अटक केली आहे. तिघांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अटक केलेल्या तिघांपैकी एक आरोपी काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. तर एका आरोपीवर एकूण 5 गुन्हे दाखल आहेत.

धारावीतून २८ लाखांचे ड्रग्ज जप्त : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या ( Anti Narcotics Sell Action ) वरळी युनिटने धारावी परिसरातून ( Dharavi Area At Mumbai ) तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. या तीन तस्करांकडून १४० ग्रॅम मेफेड्रीन (एमडी) हे अंमली पदार्थ ( Drug Smugglers Arrested) जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत २८ लाख रुपये इतकी आहे. तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने केलेल्या या कारवाई प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ कलम- ८ (क) सह २२ (ब), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून आरोपींना अटक :मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी रात्री ९. ४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. तिन्ही आरोपींकडून १४० ग्रॅम एमडी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. धारावीतील टी जंक्शन येथून केले अटक अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट, मुंबईचे पथक हे अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे तस्कर, पुरवठा, साठा करणाऱ्या तस्करांचा गस्तीदरम्यान शोध घेत होते. यावेळी सोमवारी रात्री धारावीतील टी जंक्शन या ठिकाणी २० वर्षे आणि २१ वर्षे वयाचे दोन संशयितांच्या संशयास्पद हालचालीवरून त्यांना पथकाने ताब्यात घेतले. नंतर दोन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी हे अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर एका आरोपीने त्याच्याकडे असलेले अंमली पदार्थ त्याने कोणाकडून घेतले, याबाबत चौकशी केली. यावेळी त्याने दुसऱ्या आरोपीकडून अंमली पदार्थ घेतल्याची माहिती पोलिसांना दिली.

तिसरा तस्कर सराईत गुन्हेगार :दुसऱ्या आरोपीकडे आढळून आलेले एमडी हे अंमली पदार्थ त्याने कोणाकडून घेतले याबाबत चौकशी केली गेली. त्यावेळी त्याने धारावीतील अजीज कंपाउंड येथील तिसऱ्या आरोपीची माहिती दिली. पोलीस पथकाने त्यालाही ताब्यात घेऊन त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे एमडी हे अंमली पदार्थ आढळून आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने या आरोपीविरुद्ध कलम ८ (क) सह २२ (ब), २२ (क), २९ एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तिन्ही तस्करांना अटक करण्यात आली. कुख्यात तस्करावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या तस्करीत असलेल्या तिसरा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

या कलमान्वये कारवाई :यात धारावी पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये आयपीसी कलम ३२४, ३२३, ५०४, ४२७ ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. धारावी पोलीस ठाण्यात २०२० मध्ये आयपीसी कलम ३२४, ३२३, ५०४, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात २०२० मध्ये आयपीसी कलम ३९९, ४०२ सह ३,४, २५ भा. ह. का. अन्वये गुन्हा दाखल असून माहिम पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये कलम ८ (क) सह २२ (ब) एनडीपीएस अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details