मुंबई : ६० लाखांचे एमडी ड्रग्स प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मोठी कारवाई केली आहे. आज दुपारी भायखळा येथील मदनपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कलम ८ (क) सह २२ (क), २९ एम.डी. पी. एस अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ६० लाखांचे एमडी ड्रग्स देखील जप्त करण्यात आले आहे. मदनपुरा येथे केलेल्या कारवाईत पहिल्या आरोपीकडुन १०० ग्रॅम, दुसऱ्या आरोपीकडुन २०० ग्रॅम वजनाचा "मेफेड्रॉन (M.D.)" हा अंमली पदार्थ एकुण ३०० ग्रॅम वजनाचा "मेफेड्रॉन (M.D.)" हा ६० लाख किंमतीचा आहे.
60 लाख किमतीचे ड्रग जप्त : अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने या परिसरात गस्त घालत असताना, मुंबई शहरातील अमली पदार्थ तस्करांना पकडण्यात यश आले आहे. अमली पदार्थांची विक्री विक्रेत्यांवरकडे प्रत्येकी 100 ग्रॅम, 200 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सापडले आहे. त्या दोघांविरोधात वांद्रे युनिट गुन्हे शाखा, मुंबई यांनी कलम 8(सी) सह 22(सी), 29 एमडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या ड्रगची किंमत 60 लाख आहे.