मुंबई :चॅपल रोड येथील दोन मजली इमारत अनधिकृत मानली जात होती. ती बेकायदेशीररित्या अधिकृत करून देण्यासाठी आरोपीने लाच मागितली होती. एसीबीच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराचे वांद्रे पश्चिम येथील चॅपल रोड येथे ग्राउंड प्लस टू घर आहे. 16 जानेवारी रोजी, त्याला बीएमसीकडून निष्कासनाची नोटीस मिळाली. ज्यामध्ये पहिला आणि दुसरा मजला अनधिकृत असल्याचे म्हटले होते. नोटीस मिळाल्यावर त्यांनी बीएमसीचे अभियंता मोहन राठोड यांच्या कार्यालयात जाऊन बांधकाम अनधिकृत नसल्याचे सांगून कारवाई न करण्याची विनंती केली. त्यासाठी राठोड यांनी १५ लाखांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
लाच घेताना रंगेहात पकडले :लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे जाऊन सोमवारी लेखी तक्रार दिली. एसीबीकडून आरोपांची पडताळणी करण्यात आली. ज्यामध्ये राठोडने 9 लाखांची मागणी केल्याचे उघड झाले. नंतर सेटलमेंट करत लाचेची रक्कम 8.50 लाख इतकी ठरली. खानला लाच घेताना रंगेहात पकडले. मंगळवारी, एसीबीने सापळा रचला आणि राठोडच्या कथित सूचनेनुसार खानला तक्रारदाराकडून साडेआठ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 12 (गुन्ह्यांना प्रोत्साहन देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.