महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भ पाटबंधारे सिंचन घोटाळ्यातील चौकशीची फाईल बंद - अजित पवार यांना क्लिनचीट

या प्रकरणामध्ये विदर्भा पाटबंधारे विभागातील वाशिम, बुलडाणा, अमरावती, येथील ९ प्रकरणातील चौकशीच्या फाईली बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या पुढील काळात सरकारच्या नियमात काही बदल झाल्यास अथवा न्यायालयाने काही चौकशीचे निर्देश दिल्यास पुन्हा या चौकशीवरील नस्तीबंदी उठवण्यात येईल असेही एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशीची फाईल 'नस्तीबंद'; भाजपकडून गिफ्ट?

By

Published : Nov 25, 2019, 4:34 PM IST

Updated : Nov 25, 2019, 5:25 PM IST

मुंबई- विदर्भ पाटबंधारे अंतर्गत सुरू असलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची फाईल बंद करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळा प्रकरणात अजित पवारांचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अजित पवारांना या सिंचन घोटाळ्यातून दिलासा मिळाला असल्याची चर्चा आहे. मात्र, एसीबीकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

विदर्भ पाटबंधारे सिंचन घोटाळ्यातील चौकशीची फाईल बंद

राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळात अजित पवारांनी भाजप प्रणित सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला. त्यातच आता बहुचर्चीत पाटबंधारे विभागाच्या अंतगर्त सुरू असलेल्या एसीबीच्या चौकशीची फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या सत्ता स्थापनेचा धागा या निर्णयाशी जोडला जात आहे.

या प्रकरणामध्ये विदर्भा पाटबंधारे विभागातील वाशिम, बुलडाणा, अमरावती, येथील ९ प्रकरणातील चौकशीच्या फाईली बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या पुढील काळात सरकारच्या नियमात काही बदल झाल्यास अथवा न्यायालयाने काही चौकशीचे निर्देश दिल्यास पुन्हा या चौकशीवरील नस्तीबंदी उठवण्यात येईल असेही एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आतापर्यंत सिंचन घोटाळ्यातील तपास अहवाल न्यायालयात सादर करावा लागतो. एखाद्या प्रकरणात पुरावा मिळाला नाही तर ते प्रकरण बंद करण्यात येते. तसे पत्रक न्यायालयाला द्यावे लागते, त्यापैकी हे एक पत्रक आहे. याचा मुख्य घोटाळ्याशी संबंध नाही, असी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Last Updated : Nov 25, 2019, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details