मुंबई - मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाची आज सुनावणी विशेष एनआयए न्यायालयात झाली. यावेळी या प्रकरणातला 32 वा साक्षीदार फितूर झाला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या सुनावणीत तब्बल 31 साक्षीदार फितूर झाले होते. त्यात आज आणखी एक भर पडली असून, 32 वा साक्षीदारही फितूर झाला आहे. हा साक्षीदार मध्यप्रदेशातील एका हॉटेलमध्ये त्याकाळी कामाला होता.
32 वा साक्षीदर फितूर - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. यात प्रकरणातील अनेक साक्षीदार आतापर्यंत फितूर झाले आहेत. मागील आठवड्यातच 31 वा साक्षीदार फितूर झाला होता. तर आज(31 मार्च) 32 वा साक्षीदार फितूर झाला आहे. एटीएसला दिलेल्या जबाबाबद्दल मला काहीच आठवत नाही, असे या साक्षीदाराने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे तोही आता फितूर झाला आहे.
साक्षीदार होता हॉटेलवर कामाला - मिळालेल्या माहितीनुसार, 32 वा साक्षीदार हा मध्यप्रदेशमधील एका हॉटेलवर कामाला होता. मालेगाव बॉम्बस्फोट घड़वण्यात आला त्याआधी आरोपींनी याच हॉटेलमध्ये रुम बुक केल्याची माहिती मिळत आहे. तोच साक्षीदार आता याप्रकरणी फितूर झाला आहे.