मुंबई -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast ) आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. ( Witness Change his Statement Malegaon Bomb Blast ) मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील नियमित सुनावणी होती. हा साक्षीदार आरोपी क्रमांक 6,9,11 शी संबंधित होता. तर आतापर्यंत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 18 साक्षीदार फितूर झाले आहे. पुढील सुनावणी 2 मार्च रोजी होणार आहे.
2008 मध्ये झाला होता बॉम्बस्फोट -
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची ( Malegaon Bomb Blast ) चौकशी एनआयएकडे आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ( Malegaon Bomb Blast ) आतापर्यंत 220 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यातील 18 साक्षीदारांनी त्यांची साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटार सायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.