नवी मुंबई -नवी मुंबई कोपरखैरणे ( Another dies in Koparkhairana ) सेक्टर 23 मधील भूमिपुत्र मैदानात अल्पवयीन मुलाचा खून झाला ( Murder of a minor ) आहे. 17 वर्षीय साहिल शांताराम गोळे ( Sahil Shantaram Gole ) याची डोक्यात दगड घालून हत्या ( Killed by stones on the head ) करण्यात आली आहे. साहिल कोपरखैरणे सेक्टर 15 मध्ये वास्तव्यास होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Navi Mumbai Murder : कोपरखैरणेत आणखी एकाची हत्या; अल्पवयीन साहिलच्या डोक्यात घातला दगड - stone was thrown in the head of minor Sahil
नवी मुंबई कोपरखैरणे ( Another dies in Koparkhairana ) सेक्टर 23 मधील भूमिपुत्र मैदानात अल्पवयीन मुलाचा खून झाला ( Murder of a minor ) आहे. 17 वर्षीय साहिल शांताराम गोळे ( Sahil Shantaram Gole ) याची डोक्यात दगड घालून हत्या ( Killed by stones on the head ) करण्यात आली आहे.

खुनाचा गुन्हा दाखल -साहिलहत्ये प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. साहिलची हत्या हे काही पहिले प्रकरण नाही या अगोदर देखील कोपरखैरणे परिसरात अशा प्रकारच्या खूनाच्या घटना घडल्या आहेत. या परिसरातील युवकांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अमली पदार्थांच्या नशेत एका तरुणाचा खून झाला होता. त्यामुळे साहिलच्या हत्येमागे देखील अमली पदार्थाचे सेवन आणि त्यातून उद्भवलेला वाद असे कारण तर नाही ना ? याचा शोध पोलिस घेत आहेत .