महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मे महिन्याच्या अखेरीस पश्चिम रेल्वेवर धावणार दुसरी 'एसी लोकल' - पश्चिम रेल्वे

मुंबईकरांसाठी पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहे. या लोकलमध्ये वारंवार तांत्रिक दोष आढळले असून नवीन एसी लोकलमध्ये ते दूर करण्याचे उद्दीष्ट रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ठेवले होते. पहिल्या लोकलमध्ये विजेची उपकरणे आदी सर्व जबाबदारी भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल)वर सोपवण्यात आली होती.

मे महिन्याच्या अखेरीस पश्चिम रेल्वेवर धावणार दुसरी एसी लोकल

By

Published : May 14, 2019, 4:45 PM IST

मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक वातानुकूलित व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दुसरी एसी लोकल मे महिन्याच्या अखेरीस दाखल होणार आहे.

मेधा आणि भेल बनावटीच्या दोन एसी लोकल मुंबईत दाखल झाल्या आहेत. या लोकल पश्चिम रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. यातील एक लोकल मे महिन्याअखेरीस सेवेत आणण्यात येणार आहे.

मुंबईकरांसाठी पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहे. या लोकलमध्ये वारंवार तांत्रिक दोष आढळले असून नवीन एसी लोकलमध्ये ते दूर करण्याचे उद्दीष्ट रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ठेवले होते. पहिल्या लोकलमध्ये विजेची उपकरणे आदी सर्व जबाबदारी भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल)वर सोपवण्यात आली होती.

या नवीन एसी लोकलमध्ये सर्व विद्युत उपकरणे डब्याखालून जातील, यावर भर दिला गेला आहे. त्यामुळे वीजबचतही साध्य होणार असून मोटरची क्षमताही 50 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. या नव्या एसी गाडीची मोटार आणि इतर विद्युत उपकरणे गाडीच्या तळाला बसविण्यात आल्याने प्रवाशांना बसायला अधिक जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापूर्वीच्या गाडीपेक्षा 350 अधिक प्रवासी या लोकलमध्ये सामावू शकतील. या एसी लोकलमध्ये आसन क्षमता 10 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर पोहचल्यानंतर कमी वेळात दरवाजे उघड-बंद होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 12 डब्यांतील सहा डब्यांमध्ये मोटर बसवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details