मुंबई - कोरानामुळे लॉकडाऊन काळात मुंबई तसेच विविध शहरात अडकलेल्या मजुरांसाठी अनेक मदतीचे हात पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्यात अनेक राज्यातील कामगार अडकलेले होते. त्यांना घरी सोडण्यासाठी स्पेशल श्रमिक ट्रेनने त्यांची व्यवस्था करण्यात आली. मुंबईत अनेक देवदूत कोरोना संकटात मदत करताना दिसले. त्यामध्ये सर्वच आपत्कालीन व्यवस्थेतील कर्मचारी आहेत. पण मुंबई पोलीस आणि काही सामाजिक संस्था यांच्या मदतीचे कौतुक करावे तितके कमी आहे. असाच एक प्रसंग सोमवारी मुंबई सेंट्रल स्थानकात पाहायला मिळाला. पश्चिम बंगालला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांनी मुंबई पोलिसांचे कौतुक करताना स्थानकातच मुंबई पोलीस जिंदाबाद.. जिंदाबाद.. अशा घोषणा दिल्या. हा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.
मुंबई पोलीस जिंदाबाद ! मुंबई सेंट्रल स्थानकात पश्चिम बंगालच्या मजुरांकडून घोषणा, पाहा व्हिडिओ
मुंबई पोलिसांच्या कौतुकाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांचे तसेच महाराष्ट्रातील पोलिसांनी या कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्यांची सेवा ही कौतुकास्पद आहे. त्यामुळे श्रमिक ट्रेनमधून मुंबई पोलिसांचे कौतुक होताना मुंबई पोलीस भारावून गेले.
मुंबई पोलीस जिंदाबाद ! जिंदाबाद ! मुंबई सेंट्रल स्थानकात मजुरांच्या घोषणा
सोमवारी मुंबई सेंट्रल स्थानकावर पश्चिम बंगालला जाणारी विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. वेळेनुसार ही ट्रेन मजुरांना घेऊन निघतच होती. तेवढ्यात काही पश्चिम बंगालचे अजूनही कामगार वेळेनुसार स्थानकाजवळ पोहोचले नव्हते. ट्रेन सुरू झाली आणि ते स्थानकात धावत-धावत पोहचले. ट्रेन थोडीशी पुढे सरकली, मजुरांना भीती वाटली की ट्रेन आपल्याला सोडून जाईल. तेवढ्यात पोलिसांनी व 'खाना चाहिये' या सामाजिक संस्थेतील स्वयंसेवक यांनी हे पाहिलं. मुंबई पोलिसांनी धावत ट्रेनमधील चालकांना आणि रेल्वे प्रशासनाला रेल्वे थांबवण्यासाठी विनंती केली, त्यानुसार ट्रेन थांबली व स्वयंसेवक यांनी मजुरांचे समान घेऊन ट्रेनमध्ये मजुरांना चढवण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्थानकात आणि संपुर्ण रेल्वेमध्ये मुंबई पोलिसांचा भरभरून कौतुक आणि मुंबई पोलीस जिंदाबाद अशा घोषणा कामगारांनी केल्या व स्वयंसेवकांचे आभार मानले.
मुंबई पोलिसांच्या कौतुकाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांचे तसेच महाराष्ट्रातील पोलिसांनी या कोरोना संकटात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्यांची सेवा ही कौतुकास्पद आहे. त्यामुळे श्रमिक ट्रेनमधून मुंबई पोलिसांचे कौतुक होताना मुंबई पोलीस भारावून गेले. पुन्हा एकदा असेच काम करण्याची ऊर्जा आम्हला मिळाली, असे पोलिसांनी यानंतर सांगितले.