मुंबई -राज्यात यंदा उसाचे विक्रमी पीक झाल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला यंदा ऊस गाळपाचा हंगाम संपला तरी राज्यात सुमारे 80 लाख टन ऊस शेतकऱ्यांच्या शेतात उभा होता कारखाने ऊस घेऊन जात नाहीत. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतातला ऊस जाळला यानंतर कारखान्यांनी जाळलेला ऊस घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले अखेरीस राज्य सरकारने कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अद्यापही राज्यातील कारखाने सुरू आहेत.
अतिरिक्त ऊस गाळपाला अनुदान -राज्यात यावर्षी उसाचे उत्पादन अधिक झाले असून गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे 2.25 लाख हेक्टर क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शिल्लक आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंगळवारी (दि. 17 मे) सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली या बैठकीला उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, कृषी मंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सहकार राज्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी नंतर गाळप झालेल्या सर्व उसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टन याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.