महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अण्णा भाऊ साठे ९९वी जयंती : चेंबूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिवादन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज 99 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चेंबूर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. राज्यभरात मोठ्या उत्साहात खासगी तसेच शासकीय पातळीवर अण्णा भाऊ साठेंची जयंती साजरी होत आहे.

अण्णाभाऊ साठे ९९वी जयंतीनिमित्त चेंबूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिवादन

By

Published : Aug 1, 2019, 1:17 PM IST

मुंबई - साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज 99 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चेंबूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. राज्यभरात मोठ्या उत्साहात खासगी तसेच शासकीय पातळीवर अण्णा भाऊ साठेंची जयंती साजरी होत आहे.

अण्णा भाऊ साठे ९९वी जयंती : चेंबूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिवादन

अण्णा भाऊ साठे यांचे यावर्षी जन्मशताब्दी वर्ष राज्य सरकार साजरे करणार आहे. आज अण्णा भाऊ साठे यांच्या टपाल तिकीटचे लोकार्पणही होणार आहे. जन्मशताब्दी निमित्त वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित घेतले जाणार आहेत. तसेच मुंबईत अण्णा भाऊ साठेंच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

चेंबूरच्या सुमन नगर पुलाखालील अण्णा भाऊ साठे यांच्या चेतना भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उद्यानात मुख्यमंत्री फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्याचबरोबर समाज कल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी या ठिकाणी येऊन अण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या संख्येने अण्णा भाऊ साठे यांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details