महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरण: अंकुर पनवारला जन्मठेपेची शिक्षा

प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी दोषी अंकुर पनवार याला मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.

प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरण: अंकुर पनवारला जन्मठेपेची शिक्षा

By

Published : Jun 12, 2019, 9:32 PM IST

मुंबई- प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी दोषी अंकुर पनवार याला मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंकुरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अॅसिड हल्ल्याप्रकरणी एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.

प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी दोषी आरोपीला देशात प्रथमच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबईतील बांद्रा परिसरात प्रीती राठीवर अॅसिड हल्ल्या झाला होता. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी अंकुश पणवर या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले आहे.

आरोपी अंकुर पनवार याच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाने सूनवलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक व न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी सुरू होती. ज्यावर न्यायालयाने आज निर्णय देत आरोपीची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

काय आहे प्रकरण-

दिल्लीत राहणाऱ्या प्रीती राठी या तरुणीला मुंबईतील बांद्रा परिसरात नौदलात परिचरिकेची नोकरी मिळाली होती. त्या संदर्भात प्रीती राठी ही दिल्लीहून मुंबईला आली. ती बांद्रा स्थानकावर उतरली होती. या दरम्यान तिच्या मागावर असलेल्या अंकुर पनवार या युवकाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तो फरार झाला होता. बांद्रा परिसरातील गुरू नानक रुग्णालयात प्रीती राठीने अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिली. यामध्ये शेवटी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तब्बल 9 महिन्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्ह्यातील आरोपीला अटक केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details