मुंबई -Chitra Wagh Vs Urfi Javed: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra wagh Urfi Javed Dispute ) यांच्यात कपड्यावरुन चांगलाच वाद रंगला आहे. या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania Criticize To Chitra Wagh ) यांनी उडी घेतली आहे. अंजली दमानिया यांनी रमेश भदौरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आशुतोष सेंगर यांनी ट्विट केलेला व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओत काही नृत्यांगणा विचित्र पद्धतीने नृत्य करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवरुन अंजली दमानिया ( Anjali Damania enter in Urfi Javed Raw ) यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया
प्रिय
@ChitraKWagh ताई भाजपच्या श्री @rameshbidhuri यांची ही जन आक्रोश महासभा आहे. याबद्दल आपल्याला काय मत आहे? ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल ? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? असा सवाल अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे. त्यामुळे आता अंजली दमानिया आणि चित्रा वाघ यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
चित्रा वाघ उर्फी जावेद वादउर्फी जावेदने परिधान केलेल्या तोकड्या कपड्यावरुन चित्रा वाघ ( Chitra Wagh Attack On Urfi Javed ) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर सोशल माध्यमातून चांगलाच हल्लाबोल होत आहे. उर्फी जावेदनेही डियर चित्रू असे ट्विट करुन या वादाला चांगलीच फोडणी दिली होती. त्यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर हल्लाबोल करत महिला आयोगाला हे दिसत नाही का असा सवाल केला होता. त्यामुळे चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद सोशल माध्यमातून चांगलाच रंगत आहे.
चित्रा वाघ उर्फी जावेद वादात रुपाली चाकणकर यांची एंट्रीउर्फी जावेद सार्वजनिक ठीकाणी तोकडे कपडे परिधान करते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महिला आयोगाला ( Maharashtra State Commission for Woman ) हे दिसत नाही का असा सवाल चित्रा वाघ यांनी करत महिला आयोगावर टीका केली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनीही चित्रा वाघ संजय राठोड आणि त्यांच्या इतर पक्षातील नेत्यांवर काही बोलत नाहीत. मात्र कपड्यांवरुन टीका करत असल्याचा हल्लाबोल चित्रा वाघ यांच्यावर केला होता. त्यामुळे चित्रा वाघ या एकाच वेळी उर्फी जावेद, रुपाली चाकणकर आणि आता अंजली दमानिया यांच्याशी लढत आहेत.