राज ठाकरे हे सहकुटुंब ईडीच्या चौकशीसाठी जात आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला - अंजली दमानिया - ईडी
राज ठाकरे यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होत आहे. घरातून ईडी कार्यालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, राज यांच्या बहिण, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वर्षी ठाकरे तसेच अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे असा सर्व परिवार यावेळी त्यांच्यासोबत होता.
अंजली दमानिया
मुंबई - कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. राज ठाकरे सकाळी साडेदहा वाजता कृष्णकुंजवरून सहपरिवार ईडी कार्यालयाकडे निघाले होते. त्यामुळे ते सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघाले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला? असा उपरोधिक टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मारला आहे.