महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले, मातोश्रीच्या संपर्कात सर्वच - अनिल परब - pankaja munde facebook post

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबधांमुळे पंकजा मुंडे यांनाही मातोश्रीने कधीच अंतर दिले नाही.ठाकरे- मुंडे कुटुंबीयांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. यासोबतच मातोश्रीच्या संपर्कात सर्वच आहेत, असा दावा विधानपरिषदेचे गटनेते अनिल परब यांनी केला आहे.

ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले
ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले

By

Published : Dec 2, 2019, 3:32 PM IST

मुंबई- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे त्या राजकारणात मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. पंकजा मुंडे यांना भाजपला सोडचिठ्ठी दिल्यास कौटुंबिक संबंधांमुळे त्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधानपरिषदेचे गटनेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत आता बोलणे फार कठीण आहे. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. ठाकरे- मुंडे कुटुंबीयांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. यासोबतच मातोश्रीच्या संपर्कात सर्वच आहेत, असे ते म्हणाले.

ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबधांमुळे पंकजा मुंडे यांनाही मातोश्रीने कधीच अंतर दिले नाही.पंकजांचा विधानसभा निवडणुकीत परळीमधून पराभव झाल्यानंतर हा पराभव भाजप पक्षांतर्गत असलेल्या राजकारणामुळेच झाल्याचा आरोप पंकजा मुंडे समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवशी पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details