मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी आकडेवारी दिली. ती सरकारची अधिकृत आकडेवारी आहे. आकडेवारी जर खोटी असेल तर ती तुम्हाला सरकार दरबारी तपासता येईल, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.
'महाविकास आघाडीने दिलेली आकडेवारी सरकार दरबारी तपासा'; फडणवीसांना अनिल परब यांचे प्रत्युत्तर - अनिल परब यांचे फडणवीसांना उत्तर
महाविकास आघाडी सरकारने दिलेली आकडेवारी सरकार दरबारी तपासा, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.
अनिल परब
सत्य सांगायला एक व्यक्ती पुरेशी असते, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर टीका केली होती. त्यावर अनिल परब म्हणाले की, आज दिलेली माहिती ही सरकारच्या अर्थ खात्याकडून घेतलेली आहे. तुम्ही पत्रकार परिषदेत दिलेली माहिती कुठून घेतली, ते जाहीर करावं. मी सांगितलेली आकडेवारी सरकार दरबारी उपलब्ध आहे. त्यामुळे कोण खोटं हे स्पष्ट होईल, असा टोल अनिल परब यांनी लगावला.