मुंबई -सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सरकारला दिले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व आदित्य ठाकरे यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. ठाकरे सरकार सुरळीत वाटचाल करत आहे, ही विरोधकांची पोटदुखी असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
सरकार व आदित्य ठाकरेंचे नाव खराब करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - अनिल परब - अनिल परब विरोधक टीका
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व आदित्य ठाकरे यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. ठाकरे सरकार सुरळीत वाटचाल करत आहे, ही विरोधकांची पोटदुखी असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
सुशांतची आत्महत्या आहे की नाही हे तपासणे मुंबई पोलिसांचे काम आहे. मुंबई पोलिसांनी आपले काम योग्य पद्धतीने केले आहे. या चक्रवर्तीची मागणी असल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. तिच्या मागणीला बिहार सरकारचा कन्सेंट कामी आला. महाराष्ट्रात सुशांतसिंहच्या मृत्यूचा गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे आम्हाला न विचारता, आमचे मत गृहीत न धरता हे प्रकरण सीबीआयकडे जाणे हे कुठे तरी कायद्याचा विरोधात आहे. यासाठी सर्व कायदे तज्ज्ञांनी आवाज उठवला पाहिजे, असेही परब यांनी म्हटले आहे.
सीबीआयवर केंद्र सरकारचा दबाव आहे की नाही, याबाबत आत्ताच काही बोलू इच्छित नाही. शिवसेनेने अनेक संघर्ष केले आहेत. त्यामुळे हे असे संघर्ष आम्हाला काही नवीन नाहीत. विरोधकांना सुशांतसिंहबाबत सहानुभूती नाही. त्यांना फक्त या प्रकरणाचे राजकारण करायचे आहे. आता तपास सीबीआयकडे गेलाच आहे तर सत्य बाहेर येईलच, असे अनिल परब म्हणाले.