महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतसिंह प्रकरणातील पुरावे कंगनाने सीबीआयला द्यावेत; अनिल परब यांचे आवाहन - अनिल परब यांचे कंगनाला आवाहन

अभिनेत्री कंगना रणौतने तिच्याकडे सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी असलेली माहिती सीबीआयला देण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. संजय राऊत यांनी कंगना रणौतबद्दल केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. भाजपा आमदार राम कदम यांच्यावर देखील परब यांनी टीका केली.

anil parab
अनिल परब

By

Published : Sep 4, 2020, 5:37 PM IST

मुंबई-अभिनेत्री कंगना रणौत हिने तिच्याकडे सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी काही पुरावे असल्याचा दावा करत त्यासंबधीचे ट्वीट २६ ऑगस्टला केले होते. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे नाही, यामुळे तिने तिच्याकडे असलेले पुरावे सीबीआयला द्यावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंगना रणौतला पत्रकार परिषदेत केले.

अनिल परब

कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत केंद्र सरकारकडे सुरक्षा मागितली होती. त्यामुळे तिच्याकडे असलेली माहिती तिने सीबीआयला द्यावी. सुशांतसिंह प्रकरणाच्या माध्यमातून भाजपचे आमदार राम कदम हे राज्याची आणि मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत. यातून भाजपा आणि कंगनाचे राज्य सरकार, पोलीस आणि मुंबईलाही बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप परब यांनी केला. .

हेही वाचा-सुशांतसिंह तपासाप्रकरणी माध्यमांना माहिती दिली जात नाही, सीबीआयचे स्पष्टीकरण

पंतप्रधानांना पाकव्याप्त काश्मीर देशात आणायचे आहे आणि कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली. म्हणजे पाकव्याप्त काश्मीर चांगला नाही का? जे भाजपाचे नेते कंगनाच समर्थन विचार करतात त्यांनी बघून घ्यावे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर जो देशात आणायचा प्रयत्न चुकीचा आहे का, याचे भाजपा ने तपासून पहावे, असा टोलाही परब यांनी भाजपला लगावला. सुशांतसिंह प्रकरणी बिहारमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर आर्थि‍क विषयाचे हे प्रकरण पुढे आले. त्यात आत्महत्या हा विषयच नव्हता, असेही परब म्हणाले.

मुंबईतील आर्थिक केंद्र गुजरातला हलवण्यात आले, त्याच प्रमाणे मुंबईतील बॉलीवुड कुठे दुसरीकडे हलवण्याचे वातावरण तयार केले जात नाही ना?, असा सवालही परब यांनी केला. दरम्यान, जे कोणी या ड्रग्ज प्रकरणामध्ये असतील ते सर्व पुढे येतील आणि सत्य बाहेर येईल, असेही परब म्हणाले.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कंगना रनौत हिला मुंबईत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details