मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपली आहे. अनिल देशमुख (anil deshmukh ed custody) यांना २९ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची मेडिकल चेकअप झाले. (anil deshmukh medical check up)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकिल इंद्रपाल सिंह याबाबत माध्यमांना माहिती देताना घरच्या जेवणाला परवानगी नाही -
अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती. अनिल देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनवर झोपताना पाठीला त्रास होत आहे. त्यांचे वय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेडची मागणी मान्य करावी, असा अर्ज त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी केला आहे. अनिल देशमुखांवर कारागृहात खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व्हावेत तसेच औषध पुरवण्याबाबत ही अर्ज करण्यात आला आहे. न्यायालयाने अनिल देशमुखांना वैद्यकीय उपचार, औषध आणि बेडची परवानगी दिली आहे. मात्र, घरचे जेवण देण्याला न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरला तीन दिवसांची ईडी कोठडी न्यायालयाने सुनावली होती. विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. आज त्यांची ईडी कोठडी संपली. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या देशमुख यांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीला समन्सही बजावण्यात आला होता.
हेही वाचा -Hrishikesh Deshmukh : ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर 20 नोव्हेंबरला सुनावणी
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे असा आरोप त्यांनी केलेला आहे.