महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anil Deshmukh : अनिल देशमुखांचे सत्र न्यायालयात पासपोर्ट जमा; 'हे' आहे कारण - Anil Deshmukh submits passport

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये आज पासपोर्ट जमा केले आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

By

Published : Oct 21, 2022, 7:40 AM IST

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये आज पासपोर्ट जमा केले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीन अटीच्या अनुषंगाने आज पासपोर्ट जमा केले आहे. अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ( Anil Deshmukh is currently in judicial custody )



खाजगी रुग्णालयामध्ये अँजिओग्राफीवर उपचार सुरू : अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु दुसऱ्या सीबीआय प्रकरणात अद्याप जामीन न मिळाल्याने अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहे तसेच अनिल देशमुख यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने खाजगी रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी वर उपचार सुरू आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याकरिता ईडीने 13 ऑक्टोबर पर्यंत मुदत मागितली होती. त्यानंतर ईडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत ईडीला झटका दिला होता.



काय आहे प्रकरण ?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details