मुंबई : कोरेगाव-भीमा दंगलीतील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
'कोरेगाव-भीमा दंगलीतील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे' - korgaon bhima Case
कोरेगाव भीमा दंगलीत 649 गुन्हे दाखल केले होते. त्यातील 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर राज्यात सरकारने मराठा आंदोलनाचे 548 गुन्ह्यापैकी 460 गुन्हे मागे घेतले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी कोरेगाव भीमा येथील आंदोलनकर्त्यांवरील खटले मागे घेण्याच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री अनिले देशमुख यांनी ही माहिती दिली.
कोरेगाव भीमा दंगलीत 649 गुन्हे दाखल केले होते. त्यातील 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर राज्यात सरकारने मराठा आंदोलनाचे 548 गुन्ह्यापैकी 460 गुन्हे मागे घेतले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात अनेक शेतकऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत, असे खटले, त्यासोबत नाणार प्रकल्पात 5 पैकी तिघांचे गुन्हे मागे घेतले आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.