महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख - अनिल देशमुख यांची कंगनावर टीका

कंगना रणौत हिला मुंबईत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रणौतहिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. कंगनाच्या ट्वीट नंतर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे.

anil dehsmukh
अनिल देशमुख

By

Published : Sep 4, 2020, 3:13 PM IST

Updated : Sep 4, 2020, 6:31 PM IST

मुंबई-मुंबई पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कंगना रणौत हिला मुंबईत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

अनिल देशमुख यांची कंगनावर टीका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या दररोज खळबळजनक ट्वीट करून गोंधळ उडवून देत आहे. मुंबईत सुरक्षित वाटत नसून पाक व्याप्त काश्मीर मध्ये आपण आलो की काय?, अशी टीका करणारे ट्वीट कंगनाने केले होते. या तिच्या वक्तव्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्याबाबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

हेही वाचा-कंगनाचं शिवसेनेला आव्हान; 'या तारखेला मुंबईत येतेय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा'

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही कंगना रनौत यांना मुंबईतील सुरक्षा पटत नसेल तर त्यांनी आपला गाशा गुंडाळावा, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता रणौत यांनी ट्विट करून 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहे. मला कोणी आडवत असेल तर अडवून दाखवा, असे प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता राज्यातील गृहमंत्री यांनीही त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

Last Updated : Sep 4, 2020, 6:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details