महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anil Deshmukh :अखेर देशमुख जेलबाहेर! स्थगिती मागणे थांबवा, सत्र न्यायलायने सीबीआयला झाेडपले - अनिल देशमुख बेल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्षभरानंतर जामिनावर तुरुंगातून सुटका झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आज राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते.( Anil Deshmukh ) परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पाऊस फाटा तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी (27 डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळून लावली असून त्यात देशमुख यांच्या जामीनाचा निर्णय आणखी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला तीन दिवसांचा अतिरिक्त वेळ द्यावा, अशी सीबीआयची मागणी होती, मात्र न्यायालयाने ही मागणी मान्य न केल्याने अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होता.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

By

Published : Dec 28, 2022, 4:55 PM IST

Updated : Dec 28, 2022, 10:37 PM IST

कारागृहातून बाहेर आल्यावर माजी मंत्री अनिल देशमुख प्रतिक्रिया व्यक्त करताना

मुंबई : राज्यात गाजलेल्या 100 कोटी वसुली घोटाळ्याचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात होते. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात आली. अनिल देशमुख गेल्या 13 महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत होते. ( Anil Deshmukh out of jail ) अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती आणखी वाढविण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली. याला स्थगिती मागणे आणखी किती काळ चालणार? अशा शब्दांत कोर्टाने सीबीआयला फटकारले होते. यामुळे अनिल देशमुख कारागृहात १३ महिने २६ दिवसानंतर बाहेर आले आहेत.

देशमुखांची पहिली प्रतिक्रिया : कारागृहातून बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, "माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला सूडाच्या भावनेने या प्रकरणात गोवण्यात आले. ज्या व्यक्तीने माझ्यावर 100 कोटींच्या खंडणीची आरोप केले त्याच व्यक्तीने न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रात आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. त्यात त्यांनी आपण ते पत्र फक्त ऐकीव माहितीवर दिल्याचं देखील त्या शपथपत्रात म्हटलं आहे. सचिन वझे नावाच्या गुन्हेगाराच्या साक्षीवरून मला 1 वर्ष तुरुंगात ठेवण्यात आलं."

न्याय प्रक्रियेत काय घडलं? :अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी तुरुंगाबाहेर अनिल देशमुख यांचे स्वागत केले. न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांनी 12 डिसेंबर रोजी अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता, परंतु सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मागितला आणि न्यायालयाने या आदेशाला 10 दिवसांसाठी स्थगिती दिली. तपास संस्थेने न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु न्यायालयाला हिवाळी सुट्टी असल्याने त्यांच्या अपीलवर जानेवारी 2023 मध्येच सुनावणी होईल.

स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आज राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील कारागृहाबाहेर उपस्थित होते. या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे हार घालून स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा केला. देशमुख यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे.

अशाप्रकारे अनिल देखमुख कारागृहाबाहेर :उच्च न्यायालयाने यापूर्वी 12 डिसेंबरला देशमुख यांना सीबीआय खटल्यात जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची भूमिका घेत जामीनाला 10 दिवस स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत जामिनाला स्थगिती दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाला नाताळची सुट्टी असल्याने सीबीआयच्या विनंतीवरुन स्थगितीची मुदत 27 डिसेंबरपर्यंत वाढविली होती. ( Anil Deshmukh out of jail after 1 year ) देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती वाढविण्यास न्यायालयाने नकार दिला. तातडीची सुनावणी घेण्यास सुट्टीमुळे अडचणी येत असल्याने सीबीआयने पुन्हा स्थगितीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. ही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे अखेर देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.

न्यायालयाने सीबीआयला फटकारले : मंगळवारच्या ( 27 डिसेंबर ) सुनावणीत न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती वाढविण्यास न्यायालयाने नकार दिला. तातडीची सुनावणी घेण्यास सुट्टीमुळे अडचणी येत असल्याने सीबीआयने पुन्हा स्थगितीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. ही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे अखेर ( Anil Deshmukh release from jail today ) देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना ईडीच्या खटल्यातही जामीन मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेले आहेत. याप्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीचाही ससेमिरा देशमुख यांच्या मागे लागला होता. या दोन्ही यंत्रणांनी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. अखेर आता या दोन्ही प्रकरणांमध्ये ईडीने देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक खंडपीठाकडून जामीन मंजूर : अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक त्यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरिता 10 दिवसांची मुदत सीबीआय उच्च न्यायालयाने दिली होती. मुदत संपण्यापूर्वीच सीबीआय सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. मात्र, ख्रिसमस वेकेशनमुळे कोर्टाला सुटी असल्याने सुनावणी होऊ शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती 3 जानेवारीपर्यंत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत सीबीआयला मुदत वाढवून दिली होती.

उच्च न्यायालयाचे निरीक्षण :अनिल देशमुखांना जामीन देताना कोर्टाने देशमुखांच्या वैद्यकीय स्थितीचा नीट विचार करायला पाहिजे, असे म्हटले आहे. देशमुखांचे वय जास्त आहे त्यांना विविध व्याधी आहेत, त्या विचारात घ्यायला हव्यात असे कोर्टाने म्हटले आहे. देशमुख आता गृहमंत्री नाहीत. त्यामुळे राजकीय दबाव वापरण्याचा प्रश्न येत नाही, जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते.

अटीशर्तीच्या आधारे जामीन मंजूर : देशमुखांना काही अटीशर्तींच्या आधारे 1 लाखांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना भारत सोडून, इतर दुसऱ्या देशात जाता येणार नाही आहे. अनिल देशमुख यांना तपास यंत्रणेला सहकार्य वेळोवेळी करण्याचेदेखील निर्देश उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीननंतर अटी व शर्तीमध्ये दिले आहे.

काय आहे प्रकरण :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

Last Updated : Dec 28, 2022, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details