मुंबई- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचे आज खातेवाटप झाले. आगोदर शिवसेनेकडे असलेले गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. राष्ट्रवादीत या पदासाठी अनेकजण उत्सुक असताना विदर्भातील नेते अनिल देशमुख यांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
...शेवटी राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची गृहमंत्रिपदी निवड - राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री
दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या तगड्या नेत्यांचं नावंही गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या तगड्या नेत्यांचं नावंही गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विदर्भात भाजपचा गड ढासळत असताना महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी शरद पवारांनी देशमुख यांना गृह खातं देऊन त्यांना ताकद दिल्याचे बोलले जात आहे.
अनिल देशमुख हे पहिल्यांदा 1995 साली आमदार झाले. त्याआधी नागपूर जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचा ते विदर्भातला चेहरा असून गेल्या वेळी पुतण्या आशिष देशमुखने भाजपकडून लढून त्यांना पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर सतत संपर्क ठेवून त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. यापूर्वी अनिल देशमुख यांनी युतीच्या सरकारात सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून महत्वाचे कार्यक्रम आग्रहाने नागपुरात केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे.