मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ED कडून त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ते कायदेविषयक सल्ला घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. याच संदर्भात ईडीने त्यांना समन्सही बजावले आहे. दरम्यान, या संदर्भात देशमुखांनी ईडीकडे गुन्ह्यांची कागदपत्रेही मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याने देशमुख शनिवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत.
५ जुलैला ईडी समोर होणार हजर
येत्या ५ जुलैला ईडीने अनिल देशमुखांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यांना ईडीकडून तिसरा समन्स मिळाला असून, ते कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. याआधी ईडीने समन्स बजावून देखील देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. आता या प्रकरणातील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी देशमुख यांनी काही वेळ द्या, असे आर्जव ट्विटरवर केले होते.