महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र पोलिसांनाही 50 लाखांचे विमा कवच द्या, गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी - गृहमंत्री अनिल देशमुख

महाराष्ट्रात सध्या 215 कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा वाढत असून राज्य शासनाकडून राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे राज्यातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Mar 30, 2020, 2:57 PM IST

मुंबई- कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे . अशाच प्रकारचे 50 लाख रुपयांचा विमा कवच महाराष्ट्रातील पोलिसांना द्यावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे .

महाराष्ट्रात सध्या 215 कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा वाढत असून राज्य शासनाकडून राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे राज्यातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूशी दोन हात करताना डॉक्टर, नर्स , कर्मचारी यांच्यासोबत पोलिसांनाही सध्याच्या परिस्थितीशी झगडावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांशी पोलिसांचा थेट संपर्क येत असल्यामुळे पोलिसांनाही हा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनाही 50 लाख रुपयांचे विमा कवच मिळावे, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा आपण करणार असल्याचेही त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details