मुंबई- मला परमबीर सिंह यांचे परमसत्य ( Param Bir Singh ) आयोगाला सांगायचे आहे आयोगाने मला यासंदर्भात परवानगी द्यावी ही विनंती आज (दि. 24 जानेवारी) अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोपा लावल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भात समिती गठीत करण्यात आली होती. या समितीसमोर आज अनिल देशमुख यांची उलटतपासणी झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) विनंती केली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh ) यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुलीबाबत अनेक आरोप लावल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आणि 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली. गेल्या 80 दिवसांपासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आज अनिल देशमुख यांची सचिन वाझे ( Sachin Waze ) यांच्या वकिलाकडून उलटतपासणी चांदिवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) पार पडली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मला परमबीर सिंह यांचे परमसत्य सांगायचे आहे, असे म्हणत मला परवानगी द्यावी ही विनंतीही त्यांनी केली आहे. मात्र, आयोगाने त्यांची ही विनंती फेटाळली
सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी अनिल देशमुख यांची केलेल्या उलट तपासणीतील प्रश्न उत्तर
वकील योगेश नायडू- मिलिंद भारंबे यांना प्रश्नावली कोणी तयार करून दिली .?
अनिल देशमुख- कमिशनर ऑफिसने तयार केली असू शकते.
वकील योगेश नायडू- गृह विभागाकडून मागणी करण्यात आलेली मुद्दावरील माहितीतील प्रश्न आणि भारंबे यांनी विचारलेले प्रश्न साम्य आहेत.