महाराष्ट्र

maharashtra

Anil Deshmukh Angiography : अनिल देशमुख यांचा इंजिओग्राफी रिपोर्ट टेन्शन वाढविणारा; जाणून घ्या काय आहे रिपोर्टमध्ये...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अँजिओग्राफी (Anil Deshmukh Angiography Report) करण्यात आली होती. या चाचणीमध्ये चार ब्लॉक निघाले असून 45 टक्के इतके ब्लॉक भरलेले (Anil Deshmukh Chest 45 Percent Block Filled) असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या उपचाराप्रमाणे अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू (Anil Deshmukh Treatment) असून त्यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहामध्ये पाठवण्यात (Anil Deshmukh Sent Arthur Road Jail) आले आहे.

By

Published : Nov 2, 2022, 4:56 PM IST

Published : Nov 2, 2022, 4:56 PM IST

Anil Deshmukh Angiography
अनिल देशमुख

मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अँजिओग्राफी (Anil Deshmukh Angiography Report) करण्यात आली होती. या चाचणीमध्ये चार ब्लॉक निघाले असून 45 टक्के इतके ब्लॉक भरलेले (Anil Deshmukh Chest 45 Percent Block Filled) असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या उपचाराप्रमाणे अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू (Anil Deshmukh Treatment) असून त्यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहामध्ये पाठवण्यात (Anil Deshmukh Sent Arthur Road Jail) आले आहे.

उपचारानंतर ऑर्थर रोड कारागृहात रवानगी-मुंबई सत्र न्यायालयाने जसलोक रुग्णालयामध्ये उपचाराकरिता अनिल देशमुख यांच्या अर्ज मान्य करत परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर 18 ऑक्टोंबर रोजी अनिल देशमुख यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 20 ऑक्टोंबर रोजी अनिल देशमुख यांची अँजिओग्राफी चाचणी करण्यात आली होती. चाचणी केल्यानंतर चार ब्लॉकेज निघाले असून साधारणता 45 टक्के ब्लॉकेज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर डॉक्टरांनी दिलेल्या औषधीवर प्राथमिक उपचार सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात झालेल्या उपचारानंतर त्यांना पुन्हा 30 ऑक्टोंबर रोजी मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.



देशमुखांच्या वाटेला न्यायालयीन कोठडी -अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी कडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांना वयाच्या नुसार अनेक गंभीर आजार असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी करिता परवानगी देण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला होता. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या आरोपानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. तरीदेखील अनिल देशमुख यांना तुरुंगातच राहावे लागत आहे. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात अद्यापही जामीन न मिळाल्याने त्यांना जामीन मिळवून देखीलसुद्धा न्यायालयीन कोठडीत राहावे लागत आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम वाढलेला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून 9 नोव्हेंबर पर्यंत ईडीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.


काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details