मुंबई - रिलायन्स कंपनीचे अनिल अंबानी सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. येस बँकेकडून 12 हजार 800 कोटी रुपये कर्ज घेतल्याप्रकरणी अंबानी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती.
येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता अनिल अंबानी यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी अनिल अंबानी यांना सोमवारीच ईडी कार्यालयात हजर राहणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनिल अंबानी यांनी पुढील तारखेची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना आज (गुरुवारी) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.