महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amruta Fadnavis Threat Case: अनिक्षा जयसिंघानी व अनिल जयसिंघानी यांना जामिन मिळणार का? आज होणार सुनावणी

अमृता फडणवीस यांना लाच देऊन प्रकरणात अडकवण्याच्या प्रकरणात अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी या दोघांना अटक झालेली आहे. त्यांना तुरुंगवासात ठेवलेले आहे. मात्र त्यांचा दावा आहे की, त्यांना केलेली अटक ही कायदेशीर नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे.

Amruta Fadnavis Threat Case
अमृता फडणवीस धमकी प्रकरण

By

Published : Mar 27, 2023, 10:35 AM IST

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना लाच घेण्याबाबतची धमकी देण्यात आली होती. या आरोपाखाली शहर पोलिसांनी 16 मार्च रोजी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला उल्हासनगर येथून अटक केली होती. अटक करण्यात अनिक्षा जयसिंघानीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. तिच्यावर 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अनिक्षा जयसिंघानी ही स्वत: डिझायनर आहे.

अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न :बुकी असलेला अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांनी एकत्र कट रचत अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांना दहा कोटी रुपये खंडणी आणि लाच देण्याचा देखील प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अमृता फडणवीस यांच्या मोबाईल क्रमांकावर विविध व्हिडिओ फोटो आणि संदेश पाठवले. या सर्व प्रकरणाची चाहूल लागताच अमृता फडणवीस यांनी मलबारील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंदवला होता. त्यानंतर बाप आणि लेकीवर तात्काळ कारवाई करण्यात आली.

अटक केवळ राजकिय हेतूने :अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावाही या दोघांनीही केला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज ही सुनावणी पार पडणार आहे. 16 मार्चपासून मुलगी अनिक्षा हिला अटक केली आहे. अनिल जयसिंघानी व निर्मल जयसिंघानी यांना 20 मार्च रोजी अटक केलेली आहे. अनिल जयसिंघानी याने असा दावा केलेला आहे की, आमच्यावर जे आरोप ठेवण्यात आलेले आहे, ते खोटे आहेत. आम्हाला राजकीय हेतू ठेवून अटक केलेली आहे. त्यामुळे आम्हाला विनाकारण या प्रकरणात अडकवण्यात आले आहे.

अटक बेकायदेशीर आहे :आमच्यावरील अटक बेकायदेशीर आहे. अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हजर करणे, हे भारतीय दंड विधान कलम प्रक्रियेनुसार जरुरी आहे. मात्र पोलिसांनी त्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे, असे देखील अनिल जयसिंघानी याने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यांच्या संदर्भात आज याचिकेची सुनावणी होणार आहे.

हेही वाचा : Amruta Fadnavis Threat Case : अमृता फडणवीस धमकी प्रकरण; डिझायनर अनिक्षाला न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details